Videsh

बलात्कार पीडितेस 51 कोटी रुपयांची भरपाई

By PCB Author

June 17, 2021

वॉशिंग्टन, दि. १७ (पीसीबी) : एअरबीएनबी या अग्रगण्य होमस्टे कंपनीला बलात्कार पीडितेस सात मिलियन डॉलर अर्थात 51 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर भागात भाड्यावर घेतलेल्या घरात बलात्कार झाल्याप्रकरणी पीडित ऑस्ट्रेलियन महिलेला नुकसान भरपाई देण्यात आली. 2015 मध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मित्रमैत्रिणींसह ऑस्ट्रेलियाहून अमेरिकेत आलेल्या महिलेवर एअरबीएनबीच्या रेंटल प्रॉपर्टीमध्ये चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

एअरबीएनबीच्या घरात ऑस्ट्रेलियन महिलेवर बलात्कार एअरबीएनबी या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीद्वारे अशाप्रकारे पर्यटकांसाठी राहण्याची जागा भाडेतत्त्वावर देण्याची सोय ऑनलाईन उपलब्ध आहे. पीडिता आणि तिच्या मित्रांनी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर भागातील एअरबीएनबीची प्रॉपर्टी भाड्याने घेतली होती. या घराची चावी त्यांनी शेजारच्या दुकानातून घेतली. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री उशिरा पीडिता या घरात परतली. त्यावेळी 24 वर्षीय आरोपी ज्युनिअर ली बनावट चावीने या घरात शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे संबंधित घराच्या चाव्या सापडल्या. सात मिलियन डॉलरचा चेक

बलात्कारानंतर एअरबीएनबीच्या अधिकाऱ्यांनी पीडितेची रवानगी हॉटेलमध्ये केली होती. ऑस्ट्रेलियाहून तिच्या आईला आणण्याची व्यवस्था केली. तसेच आरोग्य किंवा समुपदेशनाशी संबंधित सर्वतोपरी खर्च उचलण्याची तयारीही दाखवली होती. एअरबीएनबीने महिलेला सात मिलियन डॉलरचा (अंदाजे 51 कोटी 55 लाख 71 हजार रुपये) चेक दिला. या सेटलमेंटनुसार महिला एअरबीएनबी किंवा अपार्टमेंट होस्टला कोर्टात खेचू शकत नाही, किंवा दोषही देऊ शकत नाही.