बलात्कार पीडितांना हाकलून दिल्याप्रकरणी गृह राज्यमंत्री केसरकरांविरोधात गुन्हा

0
672

मुंबई, दि.१० (पीसीबी) – गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटण्यासाठी बलात्कार पीडित आई आणि मुलगी आपली कैफीयत सांगण्यासाठी मंत्रालयात आल्या होत्या. त्यावेळी केसरकर यांनी त्यांना हाकलून दिल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

केसरकर यांनी, ‘तुमची लायकी काय आहे, जास्त बोलायचे नाही’, असे म्हणत दालनातून हाकलून दिल्याचा या महिलांनी आरोप केला आहे. या मायलेकींवर मे २०१७मध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दीड महिन्यानंतर तक्रार नोंद करून घेतली होती.

मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल केला होता. आता आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी पुन्हा केसरकर यांची भेट घेण्याचा  त्या मायलेकींनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हाकलून दिल्याचे पीडितांनी  म्हटले आहे.