बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळले पाहिजे – काँग्रेस आमदार गेनीबेन

0
538

गांधीनगर, दि. १२ (पीसीबी) – बलात्कार करणाऱ्यांना जिंवत जाळले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस आमदार गेनीबेन ठाकोर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

भारतात प्रत्येकाला कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ५०-१५० लोकांनी एकत्र आले पाहिजे आणि त्याच दिवशी बलात्कारातील आरोपीला जिवंत जाळले पाहिजे. त्याला मारुन टाका, पोलिसांकडे सोपवू नका, असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बलात्कारामुळे संतप्त झालेल्या महिलांना आपण शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना शांत करण्यासाठी आपण ते शब्द वापरले. याशिवाय दुसरा कोणता हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.