Notifications

बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांवर हल्ले

By PCB Author

October 06, 2018

गांधीनगर, दि. ६ (पीसीबी) – वर्षभराच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा आणि अहमदाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये परप्रांतीयांविरोधात हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारामध्ये खासकरुन उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.