Desh

बलात्काराच्या आरोपाखाली चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो चटर्जीला अटक

By PCB Author

October 20, 2019

कोलकाता, दि.२० (पीसीबी) – अभिनय शिकवण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनींवर करायचा बलात्कार आरोपाखाली प्रसिद्ध चित्रपट दिग्द र्शकाला कोलकाता पोलिसांनी  केली अटक 

सुदीप्तो चटर्जी   असे या अटक केलेल्या प्रसिध्द दिग्दर्शकाच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनुसार “सुदीप्तोने अभिनय शिकवण्याच्या बाहाण्याने माझ्यावर वारंवार बलात्कार केला आहे. मी अनेकदा त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मला माझे करिअर संपवून टाकण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार पीडीतीने केली आहे. त्यानंतर झालेल्या पोलिस चौकशीत हे आरोप सिद्ध झाले. पोलिस चौकशीदरम्यान सुदिप्तोने बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. मात्र त्याने त्या तरुणीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्याचे मान्य केले. त्याच्या मते दोघांच्या संमतीने हे संबंध प्रस्तापित झाले होते. परंतु सुदिप्तोने पीडित तरुणीला केलेल्या काही मोबाईल मेसेजच्या आधारावर पोलिसांना त्याला अटक केली आहे. सुदिप्तोच्या आणखी दोन विद्यार्थांनींनी त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत