बलात्कारच्या आरोपानंतर ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांची तब्येत बिघडली

0
1105

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  बलात्काराच्या आरोपांमध्ये अडकलेले बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी अर्थात ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. #MeToo मोहीमेत नाव आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ‘तारा’ मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

“यानंतर आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या वादावर आता आलोकनाथ यांच्या वतीने त्यांचे वकील अशोक सरावगी बोलतील. आलोकनाथ यांची प्रकृती बिघडल्यामुळे मीडियाने सहकार्य करावे, अशी विनंती सरावगी यांनी केली आहे. तसेच एक-दोन दिवसात आलोकनाथ स्वत: मीडियाशी बोलतील,” अशी माहिती सरावगी यांनी दिली आहे.