बऱ्याच गोष्ठी सिध्द करण्यासाठी प्रमाणपत्राची गरज असते – उध्दव ठाकरे यांना अमृता फडणवीस यांचा टोला

0
265

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : राज्यातील मंदिर सुरु करण्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या मुद्द्यावरुन लेटर वॉर सुरु आहे. यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. दारुची दुकानं सुरु आहेत, मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रात आहेत का? असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी भाजपची सत्ता गेल्या पासून वारंवार शिवसेनेवर ट्वीट द्वारे टीका केल्याने शिवसेनेतही अस्वस्थता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ट्वीट शिवसेनेला अधिक झोंबते, असे लक्षाक आले आहे.