बर झाले मैदानातच अश्विनने त्याची जिरवली जर बाहेर घडले असते तर…

0
373

सिडनी, दि.११ (पीसीबी) : दुसरा कसोटी क्रिकेट सामना हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतावर मानसिक दडपण आणण्यासाठी काय नाही केले. त्यांच्या प्रसारमाध्यमाने देखिल यात त्यांना साथ केली, क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या आयोजनावरून वेगळेच क्रिकेटकारण खेळत होते. सामना सुरू झाल्यावर भारतीय खेळाडूंना चिडवून हिणवून झाले. इतके करूनही त्यांच्या पदरी काहीच लागले नाही. उलट सामना अनिर्णित राहिला आणि अवघ्या क्रिकेट विश्वाने भारतीय जिगरबाज प्रवृत्तीचे कौतुक केले.

तिसऱ्या कसोटीपूर्वी आणि कसोटी सामन्या दरम्यान बरेच काही घडले, घडत होते. भारतीय गप्प बसले. पण, प्रत्यक्षात तसे नव्हते. भारतीय वेळ आली की बोलतात आणि असे बोलतात की समोरच्याचे तोंडच गप्प होते. असा प्रसंग सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी आला. ऑस्ट्रेलिया विजयाच्या मार्गावर असताना चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी पहिला खोडा घातला. या जोडीच्या १४८ धावांच्या भागीदारीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पायाखालचे मैदान घसरू लागले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट जाणवत होती. अशात त्यांनी पंत, पुजारा यांच्या विकेट मिळविल्या. त्यामुळे त्यांना अधिक चेव आला.

साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्याचा वापर करण्यात ऑस्ट्रेलियन माहिर आहेत. त्यांनी आपले स्लेजिंगचे अस्त्र बाहेर काढले. अश्विन आणि पुजारा यांना टार्गेट केले. पुजारा, पंत बाद झाल्याने भारताने आपले नियोजन बदलले आणि बॅकफूटवर राहून सामना अनिर्णित ठेवण्याच्या इराद्याने खेळू लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चिडचिड वाढू लागली. नथन लायनच्या अशाच एका षटकात अश्विनने चेंडू टाकण्यासाठी त्याला रोखल्यावर यष्टिरक्षक टिम पेन याने आम्ही आता थांबू शकत नाही. तुम्हाला गॅबावरच बघून घेतो अशी टिप्पणी केली. तेव्हा शॉर्टलेगवरील खेळाडूने त्याला वू…वू असे म्हणून साथ केली. पाणी डोक्यावरून चालले होते. अश्विनने ऐकून घेतले. या वेळी तो गप्प बसला नाही. आम्ही देखील तुझी भारतात वाट पाहतोय. पण, कदाचित हीच तुझी अखेरची मालिका दिसतेयं. असे सुनावले. त्यानंतर मात्र, पेनचे तोंड गप्प झाले.

बरे, झाले मैदानातच अश्विनने त्याची जिरवली. बाहेर घडले असते, तर प्रकरण दोन्ही मंडळांकडून चौकशीपर्यंत ताणले गेले असते आणि हाती काहीच लागले नसते.