बर्ड फ्लू: ‘या’ राज्यात गेल्या १० दिवसात झाला तब्बल चार लाख कोंबड्यांचा दुर्दैवी अंत

0
294

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : बर्ड फ्लूच्या H5N8 नियंत्रित करण्याचा इशारा अनेक राज्यांनी मंगळवारी जारी केला आणि चाचणीसाठी नमुने पाठवले गेले. तर तिथेच दुसरीकडे तर केरळने कोंबडी व बदके पालनाला सुरुवात केलीये. मात्र कर्नाटक आणि तामिळनाडूच्या शेजारील केरळमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यावर लक्ष ठेवत मार्गदर्शनपर सूचना तयार केल्या गेल्या आहेत. तिथे या फ्लूमुळे जवळपास १७०० बदके मरण पावली.

हरियाणामध्ये पंचकुला जिल्ह्यात मागील दहा दिवसात एक दोन नव्हे तर तब्बल चार लाख कोंबड्यांचा या संसर्गामुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांनी जालंधरच्या विभागीय रोग निदान प्रयोगशाळेच्या पथकाने नमुने गोळा केले. आरडीडीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत एव्हीयन इन्फ्लूएन्झाची पुष्टी झालेली नाही. तर मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये १५५ मृत कावळे सापडले असून राजस्थानमधील झालावार नंतर आता कोटा आणि बारणमधील पक्ष्यांना संसर्ग झाल्याचे निदान समोर आले आहे. जे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे.

तथापि,सुदैवाने महाराष्ट्रात अद्यापपर्यंत या संसर्गाची एकाही पक्षाला बाधा झालेली नाहीये. हिमाचल प्रदेशच्या अधिका-यांनी कांग्रा जिल्ह्यातील पोंग डॅम तलाव अभयारण्याच्या आसपासच्या भागाचे सर्वेक्षण केले तेव्हा तेथील पाळीव पक्ष्यांमधील फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तेथील H5N8 साठी मृत पक्ष्यांचे नमुने तपासले असता त्यांना या संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

राज्य पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत तलावाच्या भागात २७०० स्थलांतरित पक्षी मृत अवस्थेत सापडले आहेत त्यामुळे त्यांचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.