बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एकाला चिखली पोलिसांनी केले अटक

0
544

चिखली, दि. १९ (पीसीबी) – ओळखीच्या तरुणाचा फोटो आणि नावाचा वापर करत बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याव्दारे इतरांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली. ही घटना १९ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घडली.

याप्रकरणी निलू राजकुमार जोठे (रा. मित्रवाडे पार्क, चिखली) या तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीरजकुमार सुरेशचंद कुमार (रा. मोरेवस्ती, चिखली) या इसमाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीरजकुमार याने १९ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत फिर्यादी निलू यांचा फोटो आणि नावाचा वापरकरुन फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याव्दारे त्याने बऱ्याच जणांना अश्लिल मेसेज पाठवले. हा प्रकार निलू याच्या लक्षात येताच त्याने चिखली पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नीरजकुमार याच्या विरोधात विविध कमलांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.