Pimpri

बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला

By PCB Author

September 25, 2020

दिघी,दि.२५(पीसीबी) – बनावट चावीच्या सहाय्याने दोन वेगवेगळी एटीएम मशीन उघडून त्यातून एक लाखांचे सीपीयु आणि एस अॅंड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी च-होली येथे घडली.

सचिन शिवकीरण काळगे (वय 32, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळगे हे इलेक्ट्रोनिक पेमेंट अॅंड सर्विसेस या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील 150 एटीएमची देखभाल करण्याचे काम आहे.

गुरुवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी माउलीनगर, दिघी येथील एसबीआय बँकेचे एटीएम आणि वड्मुखवाडी येथील साई मंदिराजवळ असलेले एटीएम या दोन एटीएम सेंटरमध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम मशीन उघडून त्यातून सीपीयु आणि एस अॅंड जी कंपनीचे लॉक असा एकूण एक लाख रुपयांचा माल चोरून नेला. याबाबत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.