Pimpri

बनावट चवीने फोडले चक्क वकीलाचेच घर…आणि चोरून नेल्या ‘या’ वस्तू

By PCB Author

March 08, 2021

पिंपरी, दि. ८ ( पीसीबी) – बनावट चावीने वकिलाच्या फ्लॅटचे कुलूप उघडून चोरट्यांनी घरातील फ्रिज , वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, लाकडी बेड, अलमारी असा ३ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना हिंजवडी येथे घडली.

अ‍ॅड. अमित दिनेश झा (वय ३५, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी झा यांचा हिंजवडीतील टप्पा दोन येथील युनायटेड पी. जी. येथे फ्लॅट आहे. हा फ्लॅट बंद होता. चोरटे फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून आत घुसले. घरातील प्रिâज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, लाकडी बेड, अलमारी असा ३ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. फौजदार पवार तपास करत आहेत.