बदलांवर बोलणे औचित्यभंग कसे काय? अमोल पालेकरांची नाराजी

0
564

पुणे, दि. १० (पीसीबी) – एखाद्या वक्त्याने काय बोलावे काय नाही याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसे सांगण्यात आले नव्हते. मात्र, एनजीएमएधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणे हे औचित्यभंग कसे असू शकते? असा सवाल  करून ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणात तुम्ही हे बोलू नका, असे सांगून अनेक अडथळे आणले गेले, औचित्यभंगाचं कारण पुढे करुन मला भाषण करु दिले नाही.  असे पुण्यात पत्रकार परिषदेत पालेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखले   उपस्थित होत्या.

पालेकर म्हणाले,  एनजीएमए नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रभाकर बर्वे या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारावर बोलावे सरकारवर टीका करु नये, असे मला कार्यक्रमाच्या प्रमुखांनी सांगितले. मात्र, ही संस्था आणि त्यामध्ये आता झालेले बदल यावर मी बोलणे, हे औचित्यभंग कसे आहे, हे मला कळत नाही. त्यामुळे या मंचावरुन हे बोलू नये, असे सांगण हे चुकीच आहे.