Desh

बकरी ईदनिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा!  

By PCB Author

August 22, 2018

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – संपूर्ण देशभरात आज (बुधवारी) बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. त्या निमित्ताने दिल्लीच्या जामा मशिदीत आज सकाळी ईदचे नमाज पठण करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुस्लिम बांधवांना  ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा तिनही भाषांमध्ये ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर आजच्या दिवशी आपल्या समाजातील सहानुभूती आणि बंधुभावाची भावना वाढेल, अशी अपेक्षा बाळगतो, ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

तर देशवासियांना विशेषतः मुस्लीम बांधवांना ‘ईद उल जुहा’ च्या शुभेच्छा. आपल्या समाजात एकता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी एकत्र मिळून काम करु, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.