बंबल डेटिंग अॅपवरील मित्राने मालदीवच्या ट्रिपची दिली ऑफर; विनयभंग करून 50 हजार रुपये घेऊन मित्र झाला पसार

0
225

बंबल डेटिंग अॅपवरील मित्राने मालदीवच्या ट्रिपची दिली ऑफर; विनयभंग करून 50 हजार रुपये घेऊन मित्र झाला पसार

वाकड, दि. ९ (पीसीबी) – बंबल या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या मित्राने तरुणीशी संपर्क साधून तिला मालदीवच्या ट्रिपची ऑफर दिली. त्यानंतर तिच्या घरी येऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला आणि 50 हजार रुपये घेऊन गेला. ट्रिपची तारीख उलटून गेल्यावर आपली फसवणूक आणि विनयभंग झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव गेट गुन्हा नोंदवला.

मॅडी सूर्या नावाचे युजर नेम असेलेला मुकेश सूर्यवंशी (रा. कल्पतरू सोसायटी, कल्याणीनगर, पुणे) मोबाईल क्रमांक 8291599629, 7755963709, 7061999999 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 मार्च ते 26 मार्च या कालावधीत रहाटणी येथे घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश याने बंबल या डेटिंग अॅपवरून फिर्यादीशी जवळीक साधली. इंस्टाग्राम मेसेज आणि फोनद्वारे संपर्क साधून आरोपी फिर्यादीच्या घरी आला. 13 ते 14 एप्रिल रोजी मालदीवच्या ट्रिपकरिता आरोपीने फिर्यादीला ऑफर केली. त्यानंतर मुकेश याने फिर्यादी तरुणीशी तिच्या घरी येऊन गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला आणि शरीरसुखाची मागणी केली.

21 मार्च रोजी मध्यरात्री फिर्यादीच्या घरी येऊन मुकेश याने तिचा विश्वास संपादन करून पासपोर्टची झेरॉक्स आणि 50 हजार रुपये नेले. त्यानंतर 26 मार्च पर्यंत मुकेशने फिर्यादीसोबत वारंवार संपर्क केला. ट्रीपची तारीख उलटून गेल्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की, मुकेशने त्यांना मालदीवच्या ट्रिपबाबत खोटे सांगून त्याच्याकडून 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. सुमारे दीड महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.