बंगालमध्ये भाजपने ५ खासदारांना लढविले, परंतु केवळ २ यशस्वी झाले

0
253

कोलकता, दि. ३ (पीसीबी) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण पाच खासदारांना उभे केले मात्र त्यापैकी केवळ दोनच खासदार विजयी होऊ शकले. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह अन्य तिघांचा पराभव झाला. पराभूत झालेल्यांमध्ये राज्यसभेचा राजीनामा देऊन निवडणूक लढविलेले स्वप्न दास गुप्ता आहेत. खासदारांना तिकीट देऊन विधानसभा निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकद लावली होती.

केंद्रीय राज्यमंत्री आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांना भाजपने टॉलीगंज सीटवरुन उमेदवारी दिली. परंतु बाबुल सुप्रियो तब्बल ५० हजार ८० मतांनी पराभूत झाले. हुगळीचे लोकसभेचे खासदार, लोकेट चटर्जी हे भाजपकडून चुंचुरा विधानसभा मतदारसंघातून लढल्या परंतु १८ हजार ४१७ मतांनी त्या पराभूत झाल्या. त्याचप्रमाणे कूचबिहारचे खासदार निशित प्रामाणिक यांनी दिनाहाता विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत खासदार निशित प्रामाणिक यांचा अवघ्या ५७ मतांनी पराभव झाला.

शांतीपूर येथून राणाघाट लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगन्नाथ सरकार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. जगन्नाथ सरकार हे १५ हजार ८७८ मतांनी विजयी होऊ शकले. निवडणुकिपूर्वी तथाकथित दिग्गज म्हणून अनेक रथीमहारथींना भाजपामध्ये प्रवेश दिला होता, प्रत्यक्षात त्या सगळ्यांचा जनतेने पराभव केला. प. बंगालमध्ये निकालाच्या अखेर तृणमुल काँग्रेेसला घवघवीत यश मिळाले आणि भाजपाची पूरती नाचक्की झाली.