बंगालच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ ॲम्फान धडकलं…

0
387

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं चक्रीवादळ ॲम्फान आज (20 मे) पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकले. वादळाचा वेग प्रतितास 185 किमी आहे. हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्हे हाय अलर्टवर आहेत.

चक्रीवादळ अॅम्फान मंगळवारी (19 मे) अंशत: कमकुवत झालं असलं तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांचं नुकसान होईल, एवढी ताकद या चक्रीवादळात अद्याप आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यापासून 510 किमी अंतरावर बंगालच्या खाडीत या चक्रीवादळाचं केंद्र आहे. त्यामुळे हे वादळ उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे.