बँकांना खोटी माहिती देऊन डी.एस.कुलकर्णी यांनी कर्जाची रक्कम वापरली चक्क घरखर्चासाठी

0
395

पुणे, दि. (पीसीबी) – ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटकेत असलेले  बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही मोठया प्रमाणात जाहिरातबाजी, मार्केटिंग, हॉटेलिंग, घरखर्च, मनोरंजन, टीव्ही दुरुस्ती, स्पा, यावर खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डीएसके कंपनी सन २०१४ पासून आर्थिक तोटयात जाऊ लागली होती. मात्र, कंपनी नफ्यात असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डीएसके कंपनीचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांचे हितसंबंध गुंतल्याने त्यांनी योग्य वेळीच कंपनी तोटयात असल्याचे दाखवून न दिल्याने वेगवेगळया बॅंकांनी डीएसकेडील कंपनीस कर्ज मंजूर करुन दिली, तर ठेवीदारांनी मोठया प्रमाणात गुंतवणुक केली. कंपनी तोट्यात असताना ती फायद्यात असल्याचे दाखवण्यात आले. ज्या प्रकल्पाकरिता बॅंकाकडून मोठया प्रमाणात पैसे घेण्यात आले, ते त्याकरिता न वापरता दुसरीकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे कंपनी फायद्यात न येता तिला तोटा होऊन गुंतवणुकदारांकडून स्विकारलेल्या गुंतवणुकदारांना व्याज कंपनी देऊ शकली नाही.