फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

0
213

वाकड, दि. २७ (पीसीबी) – पती-पत्नीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून पती, सासू आणि नणंदेने विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हा प्रकार वाकड परिसरात घडला.

पती गणेश चंद्रकांत भांगरे (वय 31), सासू शोभा गणेश भांगरे, नणंद सोनाली सातपुत (तिघे रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विवाहीतेने सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत विवाहितेला वारंवार घरगुती कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच विवाहिता आणि तिचा पती या दोघांच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते भरण्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.