Desh

फ्रान्सकडून अनिल अंबानींना ११२० कोटींची करमाफी; फ्रेंच वृत्तपत्राचा खळबळजनक दावा

By PCB Author

April 13, 2019

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १४३.७ मिलियन युरो म्हणजेच सुमारे ११२० कोटींची करमाफी दिली, असा खळबळजनक दावा फ्रेंच वृत्तपत्र ले माँडने केला आहे.  राफेल करारानंतर ही करमाफी दिल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

२०१५  मधील फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यांच्या  कालावधीत राफेल  विमान खरेदीसाठी करार  करण्याची प्रक्रिया सुरू होती. याच वेळी अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला ११२० कोटींची करमाफी देण्यात आली, असे ‘ले माँड’  या वृत्तपत्राने  म्हटले आहे.  या दाव्यामुळे  लोकसभा निवडणुकांच्या  प्रचारात   विरोधकांच्या हाती  आयता एक मुद्दा आल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर  चौकीदार चोर आहे, असा हल्ला सुरू ठेवला आहे. राफेल करारात  मोदींनी  हस्तक्षेप करत काही फेरबदल केले आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा करून दिला,  असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.