Pimpri

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

By PCB Author

March 03, 2021

चिखली, दि.३ (पीसीबी) – ‘तू माझ्याशी मैत्री केली नाहीस. मला भेटायला आलाय नाहीस. तर तुझे फोटो व्हायरल करिन’ अशी धमकी देत एकाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना ऑक्टोबर २०२० ते १ मार्च २०२१ या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडली.

अमोल भिवसेन वैराळ (रा. वाघोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींने फिर्यादी महिलेला वारंवार फोन करून ‘मला तुझ्याशी मैत्री कार्याची आहे. मला तुला भेटायचे आहे. तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत’ असे म्हटले. महिलेने आरोपीला नकार दिला असता त्याने ‘तू जर माझ्याशी मैत्री केली नाहीस. तू मला भेटायला आली नाहीस. तर तुझे माझ्याकडे असलेले फोटो व्हायरल करीन’ अशी धमकी दिली. पीडित महिलेने आरोपीचा फोन उचलला नाही. त्यानंतर आरोपीने महिलेच्या व्हाट्सअप वर मेसेज करून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.