फेसबुकने आज घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय …

0
223

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्स केले जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली.

‘अमेरिका निवडणुकीवेळी घेतला होता निर्णय’-
ऑक्टोबरमध्ये, कंपनीने 2020 च्या अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वातावरण तापू नये म्हणून हा निर्णय घेतला होता. तर कंपनी आपल्या न्यूज फीडमध्ये वापरकर्त्यांद्वारे पाहिलेली राजकीय माहिती कमी करण्याचा विचार करत असल्याची माहितीही मार्क यांनी दिली आहे. झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतसा आहे. तो ऐकल्यानंतर असं दिसून आलं की, लोक आता राजकीय बातम्या पाहणं पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.”

‘2020 मध्ये वाढली फेसबुकची कमाई’-
2020 च्या शेवटच्या तिमाहीत फेसबुकचा धमाकेदार नफा झाला. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात लोका घरात असल्यामुळे फेसबुकचा वापर वाढला. इतकंच नाही तर डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 11.22 अब्ज डॉलर किंवा 3.88 डॉलर्सचा नफा कमावला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जी मागच्या वर्षाच्या कालावधीपेक्षा 53 टक्के जास्त होती.

’12 टक्क्यांनी वाढला यूजर्सचा फायदा’-
फेसबुकच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर ते 22 टक्क्यांनी वाढून सुमारे 28.07 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नाही तर फेसबुकचा मासिक वापरकर्त्यांचा आधार 12 टक्क्यांनी वाढून सुमारे 2.8 अब्ज पोहोचला आहे. 2020 च्या शेवटी फेसबुकवर तब्बल 58,604 कर्मचारी काम करत होते.