फेरीवाला कायद्याच्या अमलबजावणीसाठी  बेमुदत आंदोलन  करणार; महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचा इशारा

0
437

पिंपरी दि. २५, (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड मनपा शहर फेरीवाला समितीला  विश्वासात न घेता आयुक्त परस्पर अन्याकारक  निर्णय घेत आहेत. शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अमलबजावणी होत नसून ती तातडीने करा अन्यथा फेरीवाला कायद्याच्या अमलबजावणीसाठी  बेमुदत आन्दोलन  करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यानी दिला.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने आज (मंगळवारी)  पिंपरी येथे   घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष साइनाथ खंडीजोड़, कार्याध्यक्ष राजू बिराजदर, मुख्य संघटक अनिल बारावकर, समिती सदस्य विजय शहपुरकर, इरफ़ान चौधरी, कासिम तंबोळी,  अरुणा सुतार,  मनोज पाटिल, पुष्पा पटोले, शोभा शिंदे, शिवगंगा वाघमारे, बाळासाहेब रासवे,  शोभा मेहर नीलम इट्टी  आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पात्र फेरीवाल्यांची १७ ते २९ सप्टेंबर दरम्यान नोंदणी करण्यात येणार होती. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी केली जाणार असून पात्र फेरीवाल्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या पुराव्यासह कार्यालयात जाऊन बायोमेट्रीक नोंदणी करण्याचे आवाहन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते.

मात्र आज ९ दिवस झाले संबंधित  कार्यालायाकड़े विक्रेते वारंवार चकरा मारत असून  फ़क्त त्यांची नावे रजिस्टर मध्ये लिहून जा आम्ही नंतर कळवू असे सांगितले जाते. वास्तविक सुमारे ४१०० विक्रेत्यांचे बायोमेट्रिक केवळ १३ दिवसात शक्य नाही,  यासाठी २ महिन्याची मुदत द्यावी तसेच अपात्र विक्रेत्याना  न वगळता पात्र करुण बायोमेट्रिक सर्वे करावा , अन्यायकारक कारवाई व त्रासदायक दंड अकारणी विरोधात महासंघाच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येइल, असा इशारा नखाते यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण शिंदे यांनी केले तर किरण साडेकर यांनी आभार मानले.