फॅब्रीकेशनचे काम करण्यावरून भांडण; दोघांना बेदम मारहाण

0
229

चऱ्होली, दि. २६ (पीसीबी) – फॅब्रीकेशनचे काम करण्यावरून भांडण करून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी साडेअकरा वाजता प्राईड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प, च-होली बुद्रुक येथे घडली.

शब्बीर शेख, वसीम शब्बीर शेख (दोघे रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गुफरान फाज्जन खान (वय 22, रा. साठेवस्ती, लोहगाव) यांनी शनिवारी (दि. 24) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान त्यांच्या दोन भावांसोबत मिळून प्राईड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प येथे फॅब्रीकेशनचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘हे काम कोणी केले. हे काम आम्हाला मिळाले आहे’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी खान आणि त्यांच्या दोन्ही भावांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांना मारण्यासाठी चाकू काढला असता फिर्यादी तिथून निघून जाऊ लागले. त्यावेळी वसीम शेख याने फिर्यादी यांचा पाठलाग करून फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लोखंडी पाईपने मारले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.