Pimpri

फुले रुग्णालयात क्षयरोग निदान यंत्रणेचे उद्घाटन

By PCB Author

October 26, 2020

पिंपरी, दि. २६: चिंचवडगावात तानाजीनगर मधील महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालयात क्षयरोगनिदान करणाऱ्या ट्रूनॅट मशिनचे उद्घाटन अतिरिक्त आरोग्य वैदयकीय आधिकारी डॉ.पवन साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.

“क्षयरूग्णांना बेडका तपासणीसाठी व क्षयरोगाच्या जलद निदानासाठी हि मशिन नवसंजीवनी ठरेल.” असे प्रतिपादन डॉ.साळवे यांनी केले.

कार्यक्रमावेळी आरसीएच वैदयकीय आधिकारी डॉ.वर्षा डांगे,सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सुनिल जॉन,शहर क्षयरोग नियंत्रण आधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर,शहर क्षयरोग दुरीकरण केंद्राच्या वैदयकीय आधिकारी डॉ.अंजली ढोणे, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कार्यरत कर्मचारी व लॅब टेक्निशियन उपस्थित होते.