Maharashtra

“फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा”

By PCB Author

April 06, 2020

मुंबई,दि.६(पीसीबी) – फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केलं आहे. राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी ११ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीला ज्ञानाचा दीवा तर १४ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला संविधानाचा दीप लावून ही जयंती साजरी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा, महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया, असं ते म्हणाले.

दरम्यान, माणसाने अंद्धश्रद्धा पाळू नयेत. सतत चिकित्सक असावं. वैज्ञानिक दृष्टीकोन पाळावा. दैववादी असू नये. विवेक सतत जागृत ठेवावा. कारण महाारष्ट्राला पुरोगामी विचारांची शिकवण आहे, असं ते म्हणाले.