फुकटचे दिले, म्हणजे अच्छे दिन येतील का?; पंतप्रधानांचे बंधू सोमभाईंचा सवाल

0
1413

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – फुकटचे दिले, म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा,मेहनत करा, शिक्षण घ्या,  असे  आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमभाई मोदी यांनी आज (मंगळवार) येथे केले. 

सोमभाई आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी चऱ्होली येथील साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी अच्छे दिन आले का?, असा प्रश्न केला असता सोमभाई म्हणाले की, फुकटचे दिले म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा, मेहनत करा, शिक्षण घ्या, यासाठी मेडिकल कॉलेज विद्यापीठ बनवलेले आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी होत्या. त्या सोडविल्या आहेत, असे ते म्हणाले.

लहान मुलांवर होणारे अत्याचारासाठी पालक जबाबदार आहेत. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. तरच ते मोठे झाल्यानंतर काही चुकीचे काम करणार नाहीत. मुलगी बाहेर गेली, तर तिला विचारले जाते. मात्र, मुलांना पालक काहीच जाब  विचारत नाहीत, असेही ते म्हणाले.