फास लावलेल्या अवस्थेत आढळला भाजप आमदाराचा मृतदेह!

0
268

देश,दि.१३(पीसीबी) – उत्तर दिनाजपूर इथल्या हेमताबादचे भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह आढळल्यानं खळखऴ उडाली आहे. देवेंद्र यांचा मृतदेह त्यांच्याच गावात दोरीच्या सहाय्याने लटकलेला आढळला आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

देवेंद्र रॉय यांनी गेल्या वर्षी सीपीएममधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. उत्तर दिनाजपूरची राखीव जागा देवेंद्र यांना देण्यात आली. राॅय यांचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला असला, तरी स्थानिक नागरीक व शहरातील भाजप नेते हा नियोजनबद्ध खून असल्याचा आरोप आता करत आहेत. हेमताबादच्या या घटनेमुळे मात्र शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह आढळल्यानं पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तपास सुरू आहे. नेमकी त्यांची हत्या झाली की आत्महत्या आणि आत्महत्या असेल तर का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. देवेंद्र रॉय यांची हत्या केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.