फार्मासिस्ट हा देशाच्या आरोग्य क्षेत्रातील कणा – विजय पाटील

0
700

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – फार्मासिस्ट हा देशाच्या आरोग्य क्षेत्रातील कणा आहे, असे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. चिंचवड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष सुशील शहा, आत्माराम पवार, मनोहर पाटील, प्रशांत हंबर, अजय दर्डा, अमोल शिनकर, तुषार कांकरिया ,  मनोज प्रभू व पिंपरी- चिंचवड मधील  फार्मासिस्ट उपस्थित होते.

यावेळी ‘सध्याच्या परिस्थितीतील फार्मसी व ती कशी असावी’ यावर  विवेक तापकीर यांनी तयार केलेली शॉर्टफिल्म दाखवण्यात आली. आत्माराम पवार यांनी ‘दुकान कसे असावे व फार्मासिस्ट कसा असावा’ या विषयावर  मार्गदर्शन केले. प्रशांत हंबर यांनी विविध ‘पोस्ट फार्मसिस्ट’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. मनोहर पाटील यांनी आपली पेढी कशी व्यवस्थितरित्या चालवावी, रूग्ण समुपदेन  कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, रविशेठ पवार,  संघटक सचिव प्रसाद शितोळे यांनी केले. तर स्वप्नील जंगम व शारदा पवार यांनी सूत्रसंचलन केले. विवेक तापकीर यांनी आभार मानले.