Pimpri

फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा

By PCB Author

March 12, 2023

पिंपरी, दि.: १२(पीसीबी) -सर्वे नंबर चुकीचा सांगून जमीन विक्री करत महिलेने नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते ११ मार्च २०२३ या कालावधीत थेरगाव गावठाण येथे घडला.

शांताराम श्रीपती जगताप (वय ६७, रा. थेरगाव गावठाण) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सीमा राजेंद्र शेलार (रा. थेरगाव गावठाण) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने थेरगाव गावठाण मधील सर्वे नंबर ४/९ मधील ४१ गुंठे आणि ४/१६ मधील ५६ गुंठे जमिनीचा बनावट नकाशा तयार केला. ती जमीन सर्वे नंबर ४/१७ मधील असल्याचे भासवून लोकांना नोटरी दस्त करून जमीन विकली. त्या मोबदल्यात महिलेने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. जमिनीची मोजणी केलेल्या खुणा काढून त्याची विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.