फरार आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष डोळस यांना ‘या’ गंभीर गुन्ह्याखाली अखेर अटक

0
490

खेड, दि.२० (पीसीबी) : धमकी दिल्या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोष धनश्याम डोळस, यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. खेड तालुक्यातील चांडोली येथील जमिनीचे खरेदी खत माझे नावे करून दया, नाहीतर मी तुमच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो अशी धमकी पुणे येथील बांधकाम व्यावसायिकाला वेळोवेळी दिल्यामुळे धमकी दिल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक सुदाम मटलामल नारंग याना संतोष घनश्याम डोळस यांनी चांडोली ता. खेड जि.पुणे येथील जमिन गट नं. १२२ या जमिनीचे खरेदी खत माझे नावे करून दया, नाहीतर मी तुमच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो, वेळ पडल्यास जिवे ठार मारू अशी वेळोवेळी धमकी दिली.सदाशिव पेठ पुणे येथील संदीप शहा यांचे ऑफिसमध्ये तसेच मोबाईल फोनवरून व अॅट्रोसिटी संदर्भात घाबरवणारे मॅसेज केले होते. दि.१७ डिसेंबर २०२० रोज पुणे येथे ऑफिसमध्ये येवुन सोबत आणलेल्या खरेदी खतावर जबर दस्तीने सहया घेवुन सांगेल त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय खेड येथे गुपचुप यायचे व खरेदी खतावर सहया करावयाच्या अन्यथा पुढील वर्ष बघनार नाही अशी धमकी देवुन दि ३० डिसेंबर २०२० रोजी दुयम निबंधक कार्याल खेड येथे बोलावुन घेवुन दि ३१ डिसेंबर २०२१ रोजीचे चेक देवुन हे चेक फक्त खरेदी खतामध्ये लिहिलेले आहे. हे कोणत्याही स्वरूपात वटणार नाहीत व ७/१२ माझे नावे झाले नंतर सर्व चेक माझे समोर फाडुन टाकायचे असे म्हणुन निबंधक कार्यालय खेड खरेदी खतावर सहया करण्यास भाग पाडले होते. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुदाम मटलामल नारंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष धनश्याम डोळस, त्यांच्या पत्नी व बहीण यांच्यासह २० ते २२ सर्व रा.चांडोली ता. खेड जि.पुणे यांच्या विरोधात दि २९ मार्च २०२१ रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जेव्हा संतोष डोळस यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा पासून त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता कारण, ते फरार होते.दरम्यान ते राजगुरूनगर येथे आले असताना खेड पोलिसांनी त्यांना अटक केली.