फडणवीसांनी गुजरातमधील कंपनीला दिलेले ३२१ कोटींच कंत्राट ठाकरे सरकारने केले रद्द

0
556

महाराष्ट्र, दि.४ (पीसीबी) –  राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने आधीच्या भाजपा सरकारच्या काळातील अनेक निर्णयांवर फेरविचार सुरु केला आहे. मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. या निर्णयानंतर आता राज्य सरकारने भाजपा सरकारचा अजून एक निर्णय रद्द केला आहे. गुजरातमधील एका कंपनीला दिलेले कोट्यावधींचे कंत्राट राज्य सरकारने रद्द केले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) गुजरातमधील लल्लूजी अँड सन्स या कंपनीला घोड्यांसंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट दिले होते. मात्र यामध्ये मोठी आर्थिक अनियमितता असल्याचे सांगत सरकारने हे कंत्राट रद्द केले आहे.