Maharashtra

फडणवीसांची पत्रकार परिषद संपताच नवाब मलिकांचं ट्विट; ‘आ रहा हूँ मैं…!’

By PCB Author

November 09, 2021

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासाची पत्रकार परिषद नवाब मलिक यांच्यावर आरोपांचे बॉम्बगोळे फेकले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन अगदी कवडीमोल भावात घेतली. मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या अंडरवर्ल्ड आरोपींकडून मलिकांनी जमीन कशी काय घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच आणखी 4 व्यवहार देखील मलिकांनी अंडरवर्ल्डशी केलेत, असा खळबजनक दावा त्यांनी केला. फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन ‘आ रहाँ हूँ मैं’, असं म्हणत प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासांची खळबळजनक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक बॉम्ब फोडले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून मलिकांनी कोट्य़वधींची जमीन फक्त 20 लाखात घेतली. याच्यातून नेमकं काय सूचित होते. तर मलिकांचे जमीन खरेदीचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी होते, मी चौकशी यंत्रणांना याचे पुरावे देणार आहेत. तसंच हे सगळे पुरावे शरद पवार, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

आ रहा हूँ मैं

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 9, 2021

फडणवीसांची अर्ध्या तासांची पत्रकार परिषद संपताच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन आ रहाँ हूँ मै, असं म्हणत फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं आहे. मलिक दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. याच पत्रकार परिषदेत ते फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या प्रत्येक बॉम्बगोळा निकामी करण्याचा प्रयत्न करतील.“मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. 1993 ला आम्ही मुंबईकरांच्या चिंधड्या उडताना पाहिले, आणि हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत, ज्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल आहे. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार, शिवाय राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहेत, त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत”, असं फडणवीस म्हणाले.