Maharashtra

फडणवीसजींनी विरोध केला नाही तर…; सचिन सावंतांची टिका

By PCB Author

September 28, 2020

मुंबई,दि.२८(पीसीबी) – बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. पांडे यांच्या जदयूतील प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली असून, बिहारचे प्रभारी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्लाही दिला आहे.

“देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना, जर मुंबई पोलिसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही, तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 28, 2020