Maharashtra

फक्त पंतप्रधानांनाच ‘एसपीजी’ सुरक्षा – अमित शहा

By PCB Author

December 04, 2019

नवी दिल्ली,दि.४(पीसीबी) – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ कायदा दुरूस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर आता फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाच ‘एसपीजी’ सुरक्षा मिळेल, असं केंद्रीय मंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.

‘एसपीजी’ कायदा दुरुस्तीनंतर माजी पंतप्रधानांना ही सुरक्षा पदावरून पायउतार झाल्यावर पाच वर्षांनंतर मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भविष्यात त्याला अपवाद नसतील, असं अमित शहांनी सांगितलं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली तेव्हा काँग्रेसला इतका राग आला नव्हता, जेवढा गांधी घराण्याची सुरक्षा काढल्यावर आला, असं शहांनी म्हटलं आहे.