फक्त तरुण अध्यक्षच काँग्रेसला पुनरुज्जीवीत करु शकतो – कॅ. अमरिंदर सिंग

0
444

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – कॅ. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीला आवाहनही केले की, तुम्ही राहुल गांधींच्या जागी अशी व्यक्ती शोधा जिचे व्यक्तीमत्व जादूई असेल. ती अशी व्यक्ती असेल जी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल. ज्याची नाळ तळागळातील कार्यकर्त्यांशी जोडली असेल जो त्यांना नवभारताचे स्वप्न दाखवू शकेल.

राहुल गांधी यांनी पक्षामध्ये जिवंतपणा आणून त्याला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी मार्ग दाखवून दिला आहे. आपल्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के पस्तीशीच्या आतील तरुणांची संख्या असलेला तरुण भारत सध्या जगाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळेच हे नैसर्गिक आहे की, तरुण नेताच आजच्या तरुणांच्या भावना आणि इच्छा-आकांक्षा अधिक प्रभावीपणे समजू शकेल.

त्यामुळेच राहुल गांधींसारख्या तरुण नेत्याने काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणे हे खरोखरच दुर्देवी आहे. मात्र, त्यानंतर आता त्यांच्या जागी दुसऱ्या प्रतिभाशाली तरुण नेत्याची निवड करणे गरजेचे आहे. या नेत्याकडे देशाला पुढे नेणारा दृष्टीकोन असायला हवा. त्याने केवळ देशातील बहुसंख्य तरुणांशीच कनेक्ट न होता पक्ष कार्यकर्त्यांना ताज्या विचारांचा डोसही द्यायला हवा. याद्वारे त्याला विद्वेष आणि विभाजनाचे राजकारण करीत देशाला मागे नेणाऱ्या सत्ताधारी भाजपाला टक्कर देता येईल.