Pune

प्लॅस्टिकबंदीविरोधात पुणे मिठाई फरसाण डेअरी असोसिएशनचा कडकडीत बंद

By PCB Author

June 25, 2018

पुणे, दि. २५ (पीसीबी) – राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीविरोधात पुणे मिठाई फरसाण डेअरी असोसिएशने आज (सोमवार) कडकडीत बंद पुकारला. व्यापाऱ्यांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. चितळे बंधूही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

सरकारने सरसकट प्लॅस्टिकबंदी केली असून कोणते प्लॅस्टिक वापरायचे आणि कोणते नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अधिकाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. पण त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मिठाई, डेअरी आणि फरसाण व्यावसायिकांना प्लॅस्टिकबंदीचा मोठा फटका बसला आहे. प्लॅस्टिकबंदी करताना सरकारने कोणताही पर्यायही दिलेले नाहीत. त्यामुळे पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने बंद पुकारला आहे. सरकारने यामध्ये सुधारणा न केल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.