प्लास्टिकबंदीतून हॉटेलचालकांना सवलत

0
368

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – विशिष्ट जाडीचे प्लास्टिकचे कंटेनर तसेच ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकच्या आवरणांना प्लास्टिक बंदीतून सूट देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड या संघटनेने केला आहे.

प्लास्टिकबंदीतून अलिकडेच रिटेल व्यापाऱ्यांना सरकारने सूट दिली आहे. त्याबद्दल संघटनेने सरकारचे आभार मानले आहेत. मात्र ज्याप्रमाणे किराणा माल, तसेच धान्य दुकानदारांना सूट दिली, त्याच धर्तीवर नाशवंत मालाच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला बंदीतून सूट आहे की नाही, याविषयी संभ्रम आहे. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कंटेनरवर बंदी आहे की नाही, याविषयीही स्पष्टता नाही. परंतु कारवाई होण्याच्या भीतीने हॉटेलचालकांनी कंटेनरचा वापर बंद केला आहे, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल.

आमचे म्हणणे ऐकल्यानंतर याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले. प्लास्टिकबंदीसंबंधीच्या अधिसूचनेतत सुधारणा केली जाईल, असेच सुधारित अधिसूचना येत्या दोन दिवसात काढली जाईल. त्याचबरोबर ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्लास्टिक तसेच कंटेनरवरील निर्बंध शिथिल होण्याची संकेत दिले आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले.