प्रेस शॉपमधून एक लाख 12 हजारांचा कच्चा माल चोरीला

0
308

भोसरी, दि. 18 (पीसीबी) प्रेस शॉपमध्ये प्रवेश करून चार अनोळखी चोरट्यांनी एक लाख 12 हजार 884 रुपये किमतीचा कच्चा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 16) पहाटे पावणे तीन ते पावणे चार वाजताच्या सुमारास फडकेवस्ती, निघोजे येथील विनय कार्पोरेशन प्रा. ली. येथे घडली.

प्रशांतकुमार नरेंद्रकुमार त्रिवेदी (वय 30, रा. चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या कंपाउंडच्या गेटवरून चढून चार अनोळखी चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख 12 हजार 884 रुपये किमतीचा कच्चा माल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.