प्रेरणादायक…८५ वर्षांच्या आजी हौसाबाई रामचंद्र गोळे यांची कोरोनावर यशस्वी मात..

0
361

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – संपूर्ण भारत सध्या कोरोनाच्या संकटात होरपळत असताना काही प्रेरणादायी आणि दिलासादायक बातम्याही आता समोर येऊ लागल्या आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा अधिक आहे. अशीच एक प्रेरणादायी बातमी पिंपरी चिंचवड मधून समोर आली आहे. ८५ वर्षांच्या आजी हौसाबाई रामचंद्र गोळे यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यांची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दहा दिवसापूर्वी हौसाबाई गोळे यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होते. शहरात सर्वच रुग्णालयात बेडचा तुटवडा भासत असल्याने आजींच्या कुटुंबियांना लवकर बेड उपलब्ध होत नव्हते. तेव्हा जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे यांच्या प्रयत्नातून नेहरूनगर येथील जम्बो कोवीड सेंटर येथे बेड उपलब्ध झाला आणि आजींवर उपचार सुरू झाले. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत आजी कोरोना मुक्त झाल्या. शहरात सर्वत्र हौसाबाई गोळे यांच्या जिद्दीचे कौतुक केले जात आहे.