Desh

प्रेयसीला भेटण्यासाठी बायकोला घरात कुलूप लावून केले बंद

By PCB Author

October 22, 2019

अहमदाबाद, दि.२२ (पीसीबी) – गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बायकोला घरात कुलूप लावून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी अहमदाबादच्या रायपूर भागात घडली

मिळालेल्या माहितीनुसार, पीडीतेच्या तक्रारीनुसार १६ वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या इच्छेनुसार मी लग्न केले. तेव्हापासून मला त्रास दिला जातोय असे या महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. रविवारी संध्याकाळी नवरा चांगले कपडे घालून तयार होत होता. त्यावेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला चाललाय हे त्या महिलेला समजले. मागच्या तीन वर्षांपासून त्याचे बाहेर प्रेमसंबंध आहेत. तिने यावर आक्षेप घेत नवऱ्याला जाब विचारला. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले व तिला घरात बंद केले व निघून गेला. जवळपास तासभर ही महिला घरामध्ये बंद होती. ४० वर्षीय पीडित महिलेने खादीया पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. खादीया पोलिसांनी महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी सुरु केली आहे.