प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून केली निर्घुन हत्या प्रियकराला घेतले ताब्यात

0
414

भोसरी, दि.२१ (पीसीबी) – प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता कासारवाडी येथे घडली.पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

महेश मल्हारी खंडागळे (वय 28, रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी. मूळ रा. एकुंडी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ही तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान आरोपी महेश आणि मयत महिला यांचे प्रेमसंबंध जुळले. ते दोघे एकत्र राहत होते.ते दोघे लग्न करणार होते. तरुणाने महिलेकडे लग्नासाठी आग्रह केला. मात्र महिला विवाहास तयार होत नव्हती. त्यामुळे महेश याने चारित्र्यावर संशय घेऊन राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला. याबाबत मयत महिलेची आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी प्रियकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.