प्रेमसंबंधास नकार दिल्याने संतापलेल्या तरूणाकडून मैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो स्टेट्सला

0
450

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – तरूणीने प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतापलेल्या तरूणाने मैत्रिणीचा फोटो विवस्त्र करून व्हॅाट्सअपच्या स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पप्पू (बदललेले नाव)  (वय २० वर्षे) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथे राहणाऱ्या पप्पू (बदललेले नाव) आणि मीना (बदललेले नाव) यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून मीना त्याला डावलू लागली. पप्पू याने याबाबत विचारताच तिने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने काही दिवसांपूर्वी एकत्र आक्सा बीचवर फिरायला गेल्यावर काढलेला सीमाचा आक्षेपार्ह फोटो त्याने व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवला. पप्पू याने संबंध तोडल्यास हा फोटो वायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या मीना हिने कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून पप्पू याला अटक केली.