Maharashtra

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडेंना कोणाचा बाप हरवू शकत नाही – महादेव जानकर  

By PCB Author

December 24, 2018

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – बीड आणि परळी येथून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या मोठ्या मतांच्या  फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, असा टोला नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना  राज्यमंत्री महादेव जानकर यांनी लगावला.

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जानकर बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, जो कोणी व्हॉट्स अॅपवर म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही. भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचे कारणच नाही. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे, असा निर्धार जानकर यांनी यावेळी केला.