प्रियांका चोप्राचा आरएसएसमध्ये प्रवेश?

0
433

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – बॉलिवूड गाजवल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये यशाचे झेंडे फडकवणारी ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत प्रियांकाने खाकी रंगाची शॉर्ट्स घातली आहे. ही शॉर्ट्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात वापरतात तशा खाकी हाफ चड्डीसारखी दिसतेय. यावरून प्रियांकानं संघात प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे.

फेसबुकवरील अनेक युजर्सने हा फोटो शेअर केला आहे. ‘वी सपोर्ट नरेंद्र मोदी’ या फेसबुक ग्रुपवरून तर हा फोटो अनेकदा शेअर करण्यात आलाय.

प्रियांका चोप्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केलेला नाही. १९२५ मध्ये संघाची स्थापना करण्यात आली, तेव्हापासूनच पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट असा संघाचा गणवेश होता. संघातील, लहानांपासून मोठ्यापर्यंत, सर्व सदस्यांना हा गणवेश घालणे अनिवार्य होते. संघाचा गणवेश आणि प्रियांकाची पॅन्ट या दोन गोष्टींच्या साधर्म्यामुळं हा फोटो एका नेटकऱ्याने थट्टा म्हणून ट्विटरवर टाकला होता. यासोबत त्यानं काही स्माइली टाकले होते. हा फोटो गमंत म्हणून टाकल्याचं त्यातून स्पष्ट होत होते.