प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; तरुणीचा जागीच मृत्यू

0
241

मुंबई, दि. ५ (पीसीबी)  : मालाडच्या पश्चिम भागात इन्फिनिटी मॉलजवळ एका प्रियकराने प्रेयसीवर गोळीबार केल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. या गोळीबारात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला असून, त्यानंतर प्रियकरानंही स्वतःला गोळी झाडून संपवलंय. 22 वर्षांची ही प्रेयसी गोळीबारात जागीच ठार झालीय. तर 25 वर्षांच्या प्रियकरानं स्वत:चं आयुष्यही संपवलंय. रात्री 8.30 ते 9.30च्या दरम्यान ही घटना घडलीय. दोघांचेही मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. मुलाची ओळख पटली असून, त्याचं नाव राहुल यादव असल्याचं समजतंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा करण्यात आलाय. बांगूर शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाड येथील गोळीबाराच्या घटनास्थळाला भेट दिली असून, प्रकरणाची माहिती घेतलीय. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न जमलेलं असल्यानं रागाच्या भरात प्रियकरानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. तसेच देशी कट्ट्यातून ही गोळी झाडण्यात आली असून, ते दोघेही कांदिवलीच्या आसपासचे रहिवासी आहेत.
प्रेम प्रकरणातून ही घटना घडलीय. मुलीचा दुसऱ्याच मुलासोबत साखरपुडा झालेला होता. त्यामुळेच कदाचित रागाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीला पहिल्यांदा गोळी घालून संपवलं आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत म्हणाले की, ही घटना आज संध्याकाळी घडलीय, मुलाने प्रथम मुलीवर गोळी झाडली, नंतर स्वत: ला गोळी घालून आत्महत्या केली. या गोळीबाराच्या घटनेत देशी कट्टा वापरण्यात आलाय. दोघांचीही ओळख पटली असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.