Desh

प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’मध्ये मोबाईल चोरी; काँग्रेस कार्यकर्त्यांची धरणे आंदोलन  

By PCB Author

February 12, 2019

लखनऊ, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये १५ किमीचा रोड शो केला. यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी  प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. या गर्दीचा  फायदा घेत चोरांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या महागड्या मोबाइल फोन आणि पाकिटांवर हात साफ केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली, तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलनास सुरुवात केली आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कन्नौज आणि बाराबंकी येथून जवळपास दोन डझन कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊमधून आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोडला पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांच्या महागड्या मोबाइलवर हात साफ केला.