प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथे ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सायक्लोथॉन या उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन

0
342

आकुर्डी,दि.०३(पीसीबी) – फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत सायक्लोथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये फिटनेस बाबत जनजागृती करण्यासाठी आणि जीवनातील ताणतणाव, चिंता, आळस आणि आजारांपासून मुक्त होण्यासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमा मध्ये दुपारी तीन वाजता विद्यार्थी सायकल घेऊन महाविद्यालयात उपस्थित झालेे.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयापासून सुरूवात होऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन, मुकाई चौक, सांगवडे गाव, संत तुकाराम साखर कारखाना आणि कासारसाई धरण ते परत महाविद्यालय असा एकूण चौतीस किलोमीटरचा प्रवास विद्यार्थी आणि शिक्षकांनी केला. या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे सर यांनी फ्लॅग दाखवून केली.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लोबो सर व डॉ. पी. एस तांबडे सर व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री अनिल शिंदे व लेखापाल श्री काकडे सर उपस्थित होते. या उपक्रमात महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे प्रमुख एस. व्ही पवार सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रामदास लाड व प्राध्यापक दत्तात्रय भांगे तसेच प्राध्यापक संजू भाई, प्रा आनंद गोरे, डॉ संतोष वाढवणकर व व श्री रणजीत चव्हाण यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे सर यांनी विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास तरी रोज सायकल चालवावी असे आवाहन केले. उपक्रमाचे नियोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ ज्ञानेश्वर चिमटे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा रामदास लाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.