प्राधिकरण निगडी-आकुर्डी भागातील वीजपुरवठा सुरळीत करा; मनसेची मागणी

0
508

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) प्राधिकरण निगडी-आकुर्डी,  प्रभाग क्रमांक १५  मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने  नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी   प्राधिकरण विचार मंच आणि मनसेच्या वतीने करण्यात आली.

याबाबतचे निवेदन प्राधिकरणातील  महावितरण  कार्यालयातील मुख्य कार्यकारी अभियंता  मिलिंद चौधरी,  वरिष्ठ विद्युत अभियंता संतोष  झोडगे  यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,  प्रभाग क्रमांक १५  मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने  नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक ठप्प होत आहेत. तसेच  प्रभागातील अनेक भागात  विद्युत डिपीला झाकणे नाहीत, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ८ दिवसात कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा मनसे व प्राधिकरण विचार मंचाच्या वतीने आंदोलन  करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या प्रसंगी मनसे  पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष  बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष बिपीन नाईक, प्रभाग अध्यक्ष किरण ठुबे, शाखा अध्यक्ष ॠशिकेष कांबळे,  सोमनाथ जिल्हेवार  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.