Pimpri

प्राधिकरणामार्फत संविधान भवन उभारण्याची आमदार लांडगेंची मागणी

By PCB Author

November 26, 2018

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संविधान भवन उभारण्यासाठी मोकळा भूखंड द्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात लांडगेंनी खाडेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “प्राधिकरणाने भारतातील पहिले संविधान भवन उभारावे. त्यासाठी भूखंड द्यावा. शहराच्या मध्यभागात संविधान उभारल्यास नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. नियोजित संविधान भवनात तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळांचे आयोजन करावे. इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असावेत. ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”